Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सामान्यांचं वार्षिक पॅकेज अन् सोनू सूदच्या एका महिन्याचं भाडं सारखंच! HDFC बँकेसोबत झाला मोठा करार

सामान्यांचं वार्षिक पॅकेज अन् सोनू सूदच्या एका महिन्याचं भाडं सारखंच! HDFC बँकेसोबत झाला मोठा करार

Sonu Sood Property : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने मुंबईतील वांद्रे येथील त्याची मालमत्ता एचडीएफसी बँकेला नऊ वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. वांद्रे हा मुंबईचा एक पॉश परिसर आहे जिथे अनेक सेलिब्रिटींच्या मालमत्ता आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:21 IST2026-02-10T15:16:44+5:302026-02-10T16:21:40+5:30

Sonu Sood Property : बॉलीवूड अभिनेता सोनू सूदने मुंबईतील वांद्रे येथील त्याची मालमत्ता एचडीएफसी बँकेला नऊ वर्षांसाठी भाड्याने दिली आहे. वांद्रे हा मुंबईचा एक पॉश परिसर आहे जिथे अनेक सेलिब्रिटींच्या मालमत्ता आहेत.

Sonu Sood Leases Mumbai Property to HDFC Bank for ₹11.75 Lakh Monthly Rent | सामान्यांचं वार्षिक पॅकेज अन् सोनू सूदच्या एका महिन्याचं भाडं सारखंच! HDFC बँकेसोबत झाला मोठा करार

सामान्यांचं वार्षिक पॅकेज अन् सोनू सूदच्या एका महिन्याचं भाडं सारखंच! HDFC बँकेसोबत झाला मोठा करार

Sonu Sood Property : बॉलिवूडचा 'मसिहा' म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सोनू सूद सध्या त्याच्या एका मोठ्या व्यावसायिक व्यवहारामुळे चर्चेत आला आहे. मुंबईतील वांद्रे येथील सोनू सूदची एक मालमत्ता देशातील सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने ९ वर्षांच्या करारावर भाड्याने घेतली आहे. या व्यवहाराची अधिकृत नोंदणी फेब्रुवारी २०२६ मध्ये पूर्ण झाली असून, बँक सोनू सूदला दरमहा लाखो रुपये भाडे देणार आहे.

दरमहा ११.७५ लाखांपासून सुरुवात
'स्क्वेअर यार्ड्स'च्या आकडेवारीनुसार, सोनू सूदने वांद्रे पूर्वेकडील 'ट्रेड सेंटर बीकेसी' मधील आपली जागा एचडीएफसी बँकेला भाडेकरारावर दिली आहे. पहिल्या तीन वर्षांसाठी दरमहा ११.७५ लाख रुपये भाडे असणार आहे. बँकेने यासाठी ७०.५० लाख रुपये डिपॉझिट म्हणून जमा केले आहेत. करारातील अटीनुसार, दर तीन वर्षांनी भाड्यामध्ये १५% वाढ केली जाणार आहे. म्हणजेच २०२९ मध्ये या भाड्यात मोठी वाढ होईल.

मालमत्तेचे स्वरूप आणि किंमत
सोनू सूदने ही व्यावसायिक जागा ऑक्टोबर २०१२ मध्ये सुमारे २४.२५ कोटी रुपयांना खरेदी केली होती. या जागेचा कारपेट एरिया २,७०० स्क्वेअर फूट आहे. या युनिटसोबत बँकेला तीन डेडिकेटेड कार पार्किंग स्पेसही देण्यात आल्या आहेत.

वांद्रेतील हाय-व्हॅल्यू मार्केट
मुंबईतील वांद्रे हा परिसर केवळ पॉश म्हणूनच नाही, तर 'हाय-नेट-वर्थ' लोकांसाठी पहिली पसंती मानला जातो. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वांद्रे रेल्वे स्टेशन आणि आगामी मेट्रो लाईनमुळे हा भाग बीकेसी, लोअर परेल आणि विमानतळाशी उत्तम जोडलेला आहे. याच परिसरात शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, जान्हवी कपूर यांसारख्या बड्या स्टार्सची निवासस्थाने किंवा मालमत्ता आहेत.

वाचा - १ एप्रिलपासून प्राप्तिकर नियम बदलणार; फूड व्हाउचर, शैक्षणिक सवलत आणि भेटवस्तूंवरील टॅक्समध्ये मोठी सूट

गुंतवणुकीवर 'स्मार्ट' परतावा
सोनू सूदने २०१२ मध्ये केलेली गुंतवणूक आता त्याला उत्तम 'पॅसिव्ह इन्कम' मिळवून देत आहे. मोठ्या बँकांना जागा भाड्याने देणे हा रिअल इस्टेटमधील सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर व्यवहार मानला जातो, कारण यामुळे दीर्घकाळ खात्रीशीर उत्पन्न आणि मालमत्तेच्या मूल्यात वाढ दोन्ही मिळते.

Web Title : सोनू सूद की संपत्ति एचडीएफसी बैंक को किराए पर, लाखों में किराया

Web Summary : सोनू सूद ने अपनी बांद्रा संपत्ति एचडीएफसी बैंक को नौ साल के लिए पट्टे पर दी। मासिक किराया ₹11.75 लाख से शुरू होता है, जो हर तीन साल में 15% बढ़ जाता है। सूद ने 2012 में 2,700 वर्ग फुट की जगह ₹24.25 करोड़ में खरीदी थी। इससे उन्हें सुरक्षित निष्क्रिय आय प्राप्त होती है।

Web Title : Sonu Sood's Property Rented to HDFC Bank for Lakhs

Web Summary : Sonu Sood leased his Bandra property to HDFC Bank for nine years. The monthly rent starts at ₹11.75 lakhs, increasing 15% every three years. Sood bought the 2,700 sq ft space in 2012 for ₹24.25 crores. This provides him with a secure passive income.